नांदगाव पेठेत 250 कोटींची नवी गुंतवणूक
मुंबईच्या कंपनीकडून वस्त्रोद्योगाला मोठी चालना

22 हेक्टर जागेत उभारणार उत्पादन प्रकल्प
अमरावती/24 नोव्हेंबर – नांदगाव पेठ येथील पीएम मित्र वस्त्रोद्योग उद्यानात आणखी एका मोठ्या उद्योगाची भर पडणार आहे. मु ंबई येथील इन्सिग्निया होम प्रा. लि. कंपनी 22 हेक्टर जागेत 250 कोटी रुपयांची गु ंतवणूक करून उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून 1 हजार ते 1 हजार 500 जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. विदर्भ फायबर आणि टीटीव्हीएएम अॅमस्टरडॅमनंतर या उद्यानात गु ंतवणूक करणारी ही तिसरी कंपनी ठरणार आहे. कंपनीला उद्यानातील बी-1, बी-2 आणि जी-7 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. इन्सिग्निया होम ही मु ंबईतील महालक्ष्मी येथील लक्ष्मी मिल्स परिसरात नोंदणीकृत कंपनी असून, घर सजावटीसाठी लागणार्या वस्तू ंची निर्मिती करते. कंपनीची उत्पादने 30 पेक्षा अधिक देशांत निर्यात केली जातात. भिवंडी येथील पडघा परिसरात कंपनीचा मुख्य कारखाना आहे. यापूर्वी विदर्भ फायबर कंपनीने 55 एकर जागेत 1 हजार 600 कोटी रुपयांच्या गु ंतवणुकीचा प्रकल्प प्रस्तावित केला असून, त्यातून 2 हजार रोजगार अपेक्षित आहेत. तर टीटीव्हीएएम अॅमस्टरडॅम कंपनी 150 कोटींची गु ंतवणूक करून 500 रोजगार निर्माण करणार आहे. आता इन्सिग्निया होमच्या गु ंतवणुकीमुळे तीन कंपन्यांची एकूण गु ंतवणूक सुमारे 2 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यातून 3 हजार 500 ते 4 हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या उद्यानात सुमारे 1 हजार 20 एकर परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सांडपाणी वाहिन्या आणि प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. समृद्धी महामार्गापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले हे उद्यान कापूस उत्पादक पट्ट्यात असल्याने उद्योगांसाठी फायदेशीर ठरत आहे. भविष्यात आणखी 14 हजार 300 कोटी रुपयांच्या गु ंतवणुकीसाठी चर्चा सुरू आहे.





