वरिष्ठ अधिकार्‍यांची अंजनगाव बारीच्या दवाखान्याला भेट

आपली मातृभूमीच्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी झाल्याने कामाला वेग
परशुराम आर्थिक विकास महामंडळाची विभागीय शिबिरे जाहीर
दहा गावांतील पशुपालक आणि तरुणांना मोठा दिलासा

अंजनगाव बारी/24 नोव्हेंबर – येथील नवीन शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून लवकरच हा दवाखाना पशुपालकांच्या सेवेत रुजू होणार आहे. तसेच राज्यातील ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजनांची विभागीय शिबिरे नागपूर आणि अमरावतीसह विविध जिल्ह्यांत आयोजित करण्यात आली आहेत.
अंजनगाव बारी येथील नवीन शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधून तयार असतानाही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने परिसरातील पशुपालकांचे मोठे हाल होत होते. या प्रश्नाबाबत दैनिक आपली मातृभूमीच्या 27 जूनच्या अंकात बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांनी नवीन दवाखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. प्रशासनाच्या या हालचालीमुळे रखडलेल्या कामाला चांगलीच गती मिळाली असून इमारतीचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल अशी आशा निर्माण झाली आहे.
या पाहणी दौर्‍यादरम्यान उपायुक्त तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वल्लभ जोशी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज रवाळे यांनी नवीन इमारतीची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तृषार जयस्वाल, पशुधन पर्यवेक्षक डॉ. जयश्री गावंडे, भास्कर पिसे उपस्थित होते. शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या या दवाखान्याचा अद्याप लाभ मिळत नसल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत होती. आता प्रशासनाच्या पाहणीमुळे कामाला वेग आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत 3 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयान्वये परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजनांच्या प्रचारासाठी तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी महसूल विभाग स्तरावर सकाळी 11 वाजता एक दिवसीय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

दहा गावांतील पशुपालकांना मिळणार दिलासा
अंजनगाव बारी येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुरू झाल्यास परिसरातील 10 गावांतील शेतकरी आणि पशुपालकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शासकीय निधीतून उभारलेल्या या इमारतीचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन आढावा घेतल्याने आता या कामाला वेग आला असून जनावरांच्या उपचाराची हक्काची सोय गावातच उपलब्ध होणार आहे.

Back to top button