कृषी समृद्धी योजनेला सरकारकडून मान्यता

मुंबई : कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मिती साठी गुंत वणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यातून शेतकर्‍यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्रांसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पुढील 3 वर्षांसाठी 5 हजार 668 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकर्‍यांसाठीं कृषी समृद्ध योजना फायदेशीर ठरेल.

संबंधित बातम्या

Back to top button