श्री. अंबा-एकवीरा देवीच्या गांधी चौक वाहनतळावर ‘परधर्मीयाचे’ नियंत्रण?

सोशल मीडियावर भक्तांच्या खळबळजनक पोस्ट, देवी विश्वस्तांचे कानावर हात

अमरावती / 9 फेब्रुवारी – अमरावती महानगरपालिकेचे गांधी चौकातील देवी भक्तांसाठी असलेले ‘श्री.अंबा-एकवीरा देवी’ वाहनतळाचा ठेका हिंदू व्यक्तीला देण्यात आला असला तरी वाहनतळावर प्रत्यक्ष ‘मुस्लिम’ व्यक्तीचे नियंत्रण आहे असा खळबळजनक दावा करणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहनतळाच्या मुद्याला वेगळेच वळण लागले असुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील प्रसिध्द विधिज्ञ अतुल भारद्वाज यांनी एका ग्रुपवर एक पोस्ट व्हायरल केली असून त्यामध्ये पालकमंत्री भाजपचा, आमदार महायुतीचा, महापौर भाजपचा, उपमहापौर महायुतीचा, अंबादेवी संस्थानचे सर्व विश्वस्त सर्व हिंदू तरीही नाव बदलुन (आधार कार्ड मागत नाही का? ठेका देतांना) तरीही काँग्रेसचा नेता ठेका देतो. ते ही. ुुु, नमो नमो. या पोस्ट नंतर भाजप कार्यकर्ते दिनकर वैद्य यांनी असे म्हटले आहे की, गांधी चौकातील मनपाचा वाहनतळ जरी अंबा-एकवीरा नावाने असला तरी त्याचे व्यवस्थापन श्री. एकवीरा देवी संस्थानकडे आहे. अंबादेवी संस्थानचा काहीही संबंध नाही. सर्व जबाबदारी श्री. एकवीरा देवी संस्थान व विश्वस्त मंडळाची आहे. त्यामूळे अंबादेवी संस्थानवर आरोप करु नये. दिनकर वैद्य यांच्या पोस्ट नंतर अंबादेवी संस्थानच्या एका विश्वस्तांनी हिंदीतली एक पोस्ट फॉरवर्ड केली. त्यामध्ये असे म्हटले आहे की, जावेद खान नामक मुस्लिम को ठेका दिया है लेकीन विवाद न हो इसलिए डमी हिंदू नाम के ठेकेदार के नामसे यह पार्कींग ठेका चलाया जा रहा है। यह एक गंभीर विषय है। धिरेधिरे अंबादेवी परीसर में मुस्लिम जिहादी मुस्लिम युवाओंकी संख्या भी बढ जायेंगी, कहा हिंदू लडकीयाँ और युवतीयोंकी छेडछाड भी शुरु हो जायेंगी। स्थानिक हिंदू संघटन मामले की तह तक जाके इस ठेके को रद्द करवाये और एक अच्छे सात्विक हिंदू व्यक्ती को ठेका मिले इसके लिए प्रयत्न करे। एक जागरुक हिंदू अमरावती या पोस्टवर अंबादेवी संस्थानचे सचिव रविंद्र कर्वे यांनी पोस्ट केली असुन गांधी चौकातील मनपाचा वाहनतळ जरी अंबा-एकवीरा नावाने असला तरी त्याचे व्यवस्थापन श्री. एकवीरा देवी संस्थानकडे आहे. यात अंबादेवी संस्थानची विनाकारण बदनामी करण्यात येत आहे. या पोस्टवर अंबादेवी संस्थानचे विश्वस्त तथा पदाधिकारी अ‍ॅड. रविंद्र मराठे यांनी महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने जारी केलेले एकवीरा देवी संस्थान व ठेकेदार दर्शन राजेंद्र सोनी यांचे पत्र पोस्ट केले आहे. महानगरपालिकेच्या पत्रात दर्शन राजेंद्र सोनी यांना ठेका देण्यात आल्याचे म्हटले आहे. मनपा मालकीचे गांधी चौक येथील वाहनतळ चालविण्याकरीता एकूण 10 वर्षांचा करारनामा प्रतिवर्ष 4,55,000/- व 3 वर्षानंतर 10 टक्के वाढ या अटीने आज दिनांक 12/12/2025 रोजी करारनामा करण्यात आलेला आहे. परंतु दि.15/12/2025 रोजी दुपारनंतर अमरावती महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक करीता आदर्श आचारसंहीता लागु झाल्यामुळे आपणास मध्यंतरीच्या काळात कार्यरंभ आदेश देण्यात आलेले नाही. करारनाम्यातील व निविदेतील अटी व शर्तीनुसार दि.3/2/2026 पासुन सदर वाहनतळ चालविण्याकरीता कार्यरंभ आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. रविंद्र मराठे यांनी सोशल मिडीयावर प्रतिष्ठितांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवर असे म्हटले आहे की, कृपया आधी पडताळणी करा आणि नंतरच टिप्पणी करा.
अमरावती महानगरपालिकेने गांधी चौकातील देवी भक्तांसाठी असलेल्या वाहनतळाचा ठेका जर श्री. दर्शन राजेंद्र सोनी यांना दिला आहे तर जावेद खान यांचा उल्लेख करुन सोशल मिडीयावर पोस्ट का होत आहे? ठेका जरी दर्शन सोनी यांना दिला असला तरी प्रत्यक्ष काम जावेद खान करीत आहेत का? असा प्रश्नही लोकांना पडला आहे. अमरावती महानगरपालिका व श्री. एकवीरा देवी विश्वस्तांनी याबाबत खुलासा करणे देवी भक्तांना अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या

Back to top button