लाडक्या बहिणींच्या पैशांमध्ये होणार वाढ

छत्रपती संभाजीनगर/2 फेब्रुवारीमहाराष्ट्र सर कारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केल्या पासून लाभार्थी महि लांच्या बँक खात्यात दर महि न्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केली होती आणि त्याचा प्रचारात्मक फायदा देखील पाहायला मिळाला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी घोषणा केली होती की सत्ता आल्यानंतर हा सन्मान निधी वाढवून 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये केला जाईल. एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रिपद किंवा सत्ता बदलली तरी ‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद पडणार नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, नाव गेलं की परत येत नाही, पण आम्ही दिलेला शब्द पाळतो. लाडक्या बहिणींना आम्ही लखपती बनवणार आहोत. आम्ही 2100 रुपये देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णयही योग्य वेळी घेऊ, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button