आजपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन

इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेतर्फे

देशभरातील डॉक्टर होणार सहभागी

अमरावती/दि 24 : 25 ते दिनांक 29 नोव्हेंबर 2026 दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेद्वारे इंडियन मेडिकल असोसिएशन च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धां-‘महाकु ंभ 2026’ चे भव्य आयोजन अमरावती येथे करण्यात आले आहे. अमरावती येथे होणारा हा राष्ट्रीय महाकु ंभ हा अमरावती च्या मानात एक तुरा रोवणारा ठरेल असे प्रतिपादन आईएमए अमरावती चे वरिष्ठ सदस्य व राष्ट्रीय सह सचिव डॉ. वसंत लु ंगे यांनी केले आहे. या स्पर्धेने सर्व देशभारतील डॉक्टर यांच्यात एकजुटता, बन्धुभाव तसेच सदभावना जोपासन्यात मदत होइल असे प्रतिपादन आईएमए अमरावती चे अध्यक्ष डॉ दिनेश वाघाड़े यांनी केले आहे. सदर आय एम ए राष्ट्रीय क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण देशभरातील विविध राज्यातून आयएमएचे खेळाडू सभासद सहभागी होण्यासाठी मोठ्या संखेने येणार आहेत. यामध्ये विशेषतः कर्नाटक, तामिळनाडू , केरळ, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, सिक्कीम, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, मनिपुर, इत्यादी राज्यांचा मुख्यत्वे समावेश आहे. आय एम ए च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाकु ंभ 2026 च्या आयोजनासाठी अमरावती येथील विविध मैदाने, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ तसेच स्टेडियम येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची तयारी जोरात सुरू आहे राष्ट्रीय स्पर्धांना साजेशे हे आयोजन सर्व खेळाडूंसाठी तसेच अमरावतीकरांसाठी एक विशेष पर्वणी ठरेल असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट सीझन बॉल ढ20 टूर्नामेंट, टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट, बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट, टर्फ बॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, पिकल बॉल, जलतरण, अथलेटिक्स, मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन, बुद्धिबळ, कॅरम, सायकलिंग, गोल्फ, इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश राहील. महा कुंभ 2026 या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी आयोजन समितीचे गठन करण्यात आले असून यामध्ये संयोजक – डॉ वसंत लुंगे, सहसंयोजक- डॉ दिनेश वाघाडे,आयोजन अध्यक्ष- डॉ. जयप्रकाश बनकर, आयोजन सचिवडॉ. सिकंदर अडवाणी, खजिनदार डॉ. रोहन बोबडे व डॉ. परीक्षित ठाकरे,, आयोजन सहअध्यक्ष- डॉ. संदीप दानखडे, डॉ. भूपेश भोंड, डॉ. सोनाली शिरभाते, आयोजन संयुक्त सचिवडॉ. आनंद काकाणी, डॉ. निलेश मोरे, डॉ. ऋतिका लोखंड, मुख्य समन्वयक- डॉ. धीरज सवाई, डॉ. सोहेल बारी, डॉ. प्रणित काकडे, डॉ. अनुपम राठोड, डॉ. भूषण सगणे, डॉ. अक्षय चांदूरकर, असून विविध क्रीडा स्पर्धांसाठी विविध क्रीडा समित्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 27 नोवेंबर रोज़ी सकाळी 10 वाजता ज़िल्हा स्टेडियम येथे आईएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अनिलकुमार नायक यांचे हस्ते होनार आहे. तसेच कार्यक्रमाला डॉ जयेश लेले (नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष),डॉ अनिल बोंडे (खासदार अमरावती),डॉ वसंत लु ंगे (सहसचिव राष्ट्रीय आईएमए),डॉ अबुल हसन (नियोजित राष्ट्रीय सचिव),डॉ मंजुषा गिरी (अध्यक्ष, आईएमए महाराष्ट्र), तसेच डॉ संतोष कुलकर्णी (माजी अध्यक्ष, आईएमए महाराष्ट्र)यांची विशेष उपस्थिति राहनार आहे.

Back to top button