वसुली एजंटचा थेट रुग्णालयात महिलेकडे कर्जाचा तगादा

सरकारचा धाक राहिलाय की नाही?

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथील घटना

अकोला/19 नोव्हेंबर : राज्यात दुष्काळ परिस्थितीमुळे यंदा सरकारकडून विविध उपायोजना केल्या आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी बांधवांकडे असलेल्या जनावरांना आणि चारा देण्याची सोय करण्यात येत आहे. यासह, राज्यातील 300 हून अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. मात्र, दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच, कर्जवसुलीसाठी बँका, फायनान्स कंपन्या तगादा लावत आहेत. त्यामुळे, फायनान्स कंपन्यांनाही सरकारने सक्तीने वसुली न करण्याचा इशारा दिला. मात्र, (-ज्ञेश्रर) अकोल्यात बँकेच्या (इरपज्ञ) वसुली एजंटने चक्क रुग्णालयातून जाऊन महिले कडे वसुलीसाठी तगादा लावल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. कर्जवसुलीचा तगादा किती टोकाला जाऊ शकतो, याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये समोर आलाय. उपचारा साठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेलाही एका खासगी बँकेच्या वसुली कर्मचार्‍याने सोडलं नाही. वैशाली गोपाल इंगळे या महिला रुग्णालयात उपचार घेत असतानाच हा कर्मचारी थेट तिच्याजवळ पोहोचला आणि कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावू लागला. या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍याने संबंधित वसुली कर्मचार्‍याला चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर, तो एजंट निघून गेला आहे.

Back to top button