अर्थखात्यासाठी फडणवीसांचे राष्ट्रवादीला ब्लॅकमेल?

हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप; अजितदादांच्या अपघातावरही व्यक्त केली शंका

मुंबई/19 नोव्हेंबर:  राष्ट्रवादीत अर्थ खात मिळवण्याची धमक नाही. राष्ट्रवादीचे काहीतरी प्रकरण आहे त्या प्रकरणात ब्लॅकमेल करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थखातं त्यांच्याकडे ठेवत आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. या दोन पैकी काय याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाने खुलासा केला पाहिजे असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी 104 वेळेला चार्टर विमानातून प्रवास केला आहे. पण मूळ मुद्दा आहे अजित पवारांचा घातपात की अपघात या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठलाच चौकशी अहवाल का आला नाही असे सपकाळ म्हणाले. या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी सर्व स्तरातून झाली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील या संदर्भात मागणी केली होती. याचे काय झाले माहित नाही असेही सपकाळ म्हणाले. या प्रकरणात सीबीआयची चौकशी देखील करावी अशी काँग्रेसची मागणी आहे. या कंपनीच्या मालकाचे कोणाशी संबंध आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, एका माणसाला वाचवण्याकरता कारवाई होत नाही असेही सपकाळ म्हणाले.
घातपात झाला का? अपघात झाला या संदर्भात रोहित पवार मागणी करत आहेत, ती अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरुपाची आहे. पुरावे सादर केले आहेत. त्यामुळं दिवसेंदिवस अजितदादांच्या अपघाताची शंका दाट होत चालली आहे. त्यांचा घात झाला अशी शंका वाढली आहे असेही सपकाळ म्हणाले. एक वर्ष पूर्ण होत आले मात्र त्यांचा पक्ष झोपलेला आहे. जमिनीवर काय पातळातून आरोपी आम्ही शोधून आणू असे असे घोषणा करणारे मुख्यमंत्री धादांत खोट बोलत आहेत. कुठली ना कुठली लपाछपी अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात केली जात असल्याचे सपकाळ म्हणाले. शिंदेसेना ही शिंदेसेना नसून गद्दारांची टोळी असल्याची टीका सपकाळ यांनी केली. ज्या बाळासाहेब ठाकरेंचे बोट धरून आले त्यांचा फोटो काढला शिवसेनेशी गद्दारी केली. सोनिया गांधींचे व्यक्तिगत चरित्र पाहत असताना त्यांनी मानसिक दिवाळखोरी व्यक्त केली. हे विकृत आणि टिळकपणे लोक आहेत त्यांना लवकर धडा शिकवला पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.
सरकारने शेतकर्‍यांच्या हातावर तुरी दिली- 5000 रुपयांच्या मदतीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता विखारी टीका केली आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या हातावर तुरी दिली आहे. पाच हजार रुपयांचे मदत देण्याचे नाटक करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे असे सपकाळ म्हणाले. केंद्र सरकार राज्य सरकारची मदत वगळता शेतकर्‍याला 1 लाख रुपये हेक्टरी द्या ही आमची मागणी आहे.

Back to top button