तुम्ही कर्मचार्‍यांचे पगार वाढवले का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉर्पोरेट क्षेत्राला सवाल

12 लाखाच्या उत्पन्नावरील प्राप्तिकर सवलतीकडे वेधले लक्ष

नवी दिल्ली/19 नोव्हेंबर : नुकतेच गेमिंग विश्वातील बहुचर्चित व्हिडीओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो 6 बाजारात आला आहे. तरुणांमध्ये खासकरून नव्या पिढीमध्ये या व्हिडीओ गेमची चांगलीच चर्चा आहे. अशामध्ये याच व्हिडीओ गेमच्या प्रसिद्धीचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांशी संवाद साधला. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे गृरुवारी (19 नोव्हेंबर) फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक दावे केले. गेल्या 12 वर्षांत 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. असा दावा त्यांनी केला आहे. ‘खा, प्या आणि मजा करा’ या तत्वावर भारतीय संस्कृती विश्वास ठेवत नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात बचतीला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी मंत्री आणि सरकारी अधिकार्‍यांना लोकांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय संस्कृती ‘खा, प्या आणि मजा करा’ या मानसिकतेवर विश्वास ठेवत नाही. गरिबीतून बाहेर पडलेल्या लोकांना पुन्हा आर्थिक अडचणीत येण्यापासून रोखण्यासाठी बचतीची सवय आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2011 ते 2023 दरम्यान जगातील सर्वात वेगाने गरिबी कमी करणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश होणे ही राष्ट्रीय आनंदाची बाब आहे. त्यांनी या यशाचे श्रेय सरकार, अधिकारी, उद्योग आणि सामान्य जनतेच्या सामूहिक योगदानाला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या आयकर सवलतींसंदर्भात भाष्य करत भारतीय उद्योग जगताला एक मोठा आणि थेट प्रश्न विचारला. मी उत्पन्नावरील करात सूट दिली, पण आपण कर्मचार्‍यांचे सॅलरी अथवा कर्मचारी संख्या वाढवली का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग जगताला केला. ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी, कर कपातीचा लाभ कर्मचार्‍यांपर्यंतही पोहोचेल, याची खात्री करावी, असे आवाहनही उद्योगजगताला केले.यावेळी पंतप्रधान म्हणाले, 2014 मध्ये कॉर्पोरेट कराचा मूळ दर 30 टक्के होता. आम्ही तो 22 टक्क्यांपर्यंत कमी केला. आज भारतात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर नाही. मी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर सूट दिली, पण तुम्ही सॅलरी अथवा कर्मचार्‍यांची संख्या वाढवली का? नाही. एवढेच नाही तर, ’मोदीजी, आपण करा, आम्ही बघून घेऊ’, अशाच पद्धतीने चालणार का? असा प्रश्नही यावेळी पंतप्रधान मोदी उद्योजकांना केला.
पंतप्रधान पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्रातील लोक या उपायांमुळे समाधानी होणार नाहीत, हे माहीत असूनही सरकारने भरीव आयकर सवलत देण्याचा निर्णय घेतला. या आयकर सवलतीमुळे लोकांची क्रयशक्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे, असे म्हणत, त्यांनी उद्योगांना सरकारच्या या प्रयत्नांना स्वीकारण्याचे आवाहनबी केले.आयटीआर फाईल करणे आणि रिफंड प्रक्रियेत केलेल्या सुधारणांसंदर्भात बोलताना, करदात्यांचा पैसा विनाकारण अडकून राहू नये यासाठी सरकारने यंत्रणा सोपी केली आहे. पूर्वी एक पत्र येण्यासाठी 8 महिने लागायचे, आज अवघ्या एका आठवड्यात रिटर्न प्रोसेस होत नाही का? असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला

Back to top button