भाजप आमदाराला 3 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

रायगड/19 नोव्हेंबर-भाजपचे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांना अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी (उगच्) न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2010 मधील एका मारहाण प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला. ?
महेश बालदी यांच्यासह एकूण 4 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण 2010 सालचे आहे. उरण परिसरातील एका मुलीची छेडछाड झाली होती. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी आणि त्यांचे काही सहकारी संबं धित तरुणाकडे गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून संबंधित तरुणाला गंभीर दुखापत व शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अलिबाग न्यायालयात खटला सुरू होता.
चारही आरोपींना जामीन मंजूर-अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकार्यांनी या खटल्यावर आज अंतिम निकाल सुनावत आमदार महेश बालदी यांच्यासह चारही आरोपींना 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर या चारही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, जिल्हा न्यायालयात या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.





