अमरावतीत मधुमेह जनजागृतीसाठी आरोग्य रॅली
शिवटेकडीवर निसर्गभ्रमंतीसोबत रक्तशर्करा तपासणी शिबिर

25 वर्षांपासून मधुमेही रुग्णांना मोफत इन्सुलिन आणि साहित्य
तज्ज्ञ डॉक्टरांसह विविध सामाजिक संघटनांचा उपक्रमात सहभाग
पत्रकार परिषदेत दिली माहिती
अमरावती /12 नोव्हेंबर- मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासोबतच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देण्यासाठी अमरावतीत परवा सकाळी 8.30 वाजता शिवटेकडी येथे निसर्गभ्रमंती रॅली आणि मोफत रक्तशर्करा व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती मधुमेह संघटना, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पीडीएमएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मधुमेह नियंत्रण, हृदयविकारापासून बचाव आणि योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या 25 वर्षांपासून संघटनेमार्फत 25 वर्षांपर्यंतच्या मधुमेही रुग्णांना दर महिन्याला 2 वेळा मोफत इन्सुलिन, औषधांच्या सुया आणि आवश्यक साहित्य दिले जात आहे. पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय डफळे, सचिव डॉ. मिलिंद जगताप आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांनी ही माहिती दिली. संघटनेची स्थापना 1996 मध्ये झाली असून, जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने रुग्णांना नियमित मदत केली जाते. 4 ऑक्टोबर 2024 पासून जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्रमांक 9 जवळील बालमधुमेह उपचार केंद्रात ही सुविधा सुरू आहे. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्या शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत रुग्णांना साहित्याचे वाटप केले जाते. या सेवेत डॉ. अभिजित देशमुख, डॉ. रोहित चोरडिया, डॉ. स्वप्निल शिरभाते, डॉ. अजय डफळे, डॉ. तृप्ती जवाडे, डॉ. दिनेश वाघाडे, डॉ. कश्मिरा कडू, डॉ. सोमेश चौधरी, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. विक्रम कोकाटे, डॉ. विक्रम रोडे, डॉ. गणेश बनसोड, डॉ. गौरव जगताप, डॉ. सूरज भूतडा, डॉ. स्वानंद लुंगे, डॉ. आदित्य डागा, डॉ. दीपाली भैसे, डॉ. वैशाली धनविजय आणि डॉ. उज्ज्वला ढवळे यांचा सहभाग आहे. रॅलीला खा. डॉ. अनिल बोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. दिलीप जाणे, डॉ. अनिल देशमुख, डॉ. रवींद्र चोरडिया, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. सुनय व्यास, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. राजेंद्र ढोरे, डॉ. संजय भस्मे, डॉ. किशोर अंबाडेकर आणि डॉ. रवींद्र मुंदे यांचे सहकार्य लाभले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, ओसवाल नवयुवक मंडळ, जैन संस्कार युवा मंच, रोटरी क्लब, नेत्ररोगतज्ज्ञ संघटना, एमआर संघटना आणि राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला डॉ. दिनेश वाघाडे, महेंद्र भंसाळी, डॉ. प्रवीण राठी आणि राजेश पिडी उपस्थित होते.





