अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

कारंजा लाड/12 नोव्हेंबर ;  भाऊबीजेचा सण साजरा करण्यासाठी आपल्या भावाच्या घरी आलेल्या बहिण व भाचावर काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना कारंजा दारव्हा रोडवरील बोदेगाव साखर कारखान्यानजिक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुयातील पिंप्री फॉरेस्ट येथील रहिवासी संजय श्रीराम राठोड यांची पत्नी उषा राठोड व मुलगा रोणीत हे आपल्या मोपेड दुचाकी ने दारव्हा येथील भावाला भाऊबीज निमित्त ओवाळायला गेले.
11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भावाला ओवाळून कारंजा कडे परत येत असताना बोदेगाव साखर कारखान्यानजिक अज्ञात वाहनाने त्यांना जबरदस्त धडक दिली, त्यामध्ये दोघेही मायलेक गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी दोघांनाही दारव्हा येथील रुग्णालयात नेले असता आईचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले तर मुलाला नागपूर नेण्याचा सल्ला दिला. त्याला नागपूर नेत असताना त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. संजय व उषा यांचा रोणीत एकूलता एक मुलगा होता. मायलेकांनी दिवसभर सणाचा आनंद लुटल्यानंतर आणि भावाचे औक्षण केल्यानंतर मायलेक सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दुचाकीने आनंदाने कारंजाकडे परत येत असताना काळानेघाला घातला.अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी दारव्हा पोलिस अधिक तपास करत आहेत. भाऊबीजेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 12 नोव्हेंबर रोजी मायलेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी सर्वांचे मन हेलावून गेले होते.पत्नीला व एकूलत्या एक मुलाला अग्नी देतांना संजय राठोड हतबल झाले होते.

Back to top button