ट्रकच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर/4 नोव्हेंबर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकने दुचा कीला जोरदार धडक दिल्याने प्राध्या पिकेचा मृत्यू झाला. प्रियंका प्रवीण मोरे/ प्रियंका साहेबराव खांडेकर (वय, 35) असे मृत महिलेचे नाव आहे. फिर्यादी प्रा. जीवन नामदेवराव डेहनकर (वय 40, रा. महात्मा गांधी नगर, हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियंका मोरे हिंगणा येथील वायसीसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
मंगळवारी सकाळी 10.30च्या सुमारास प्रियंका मोरे दुचाकीने महाविद्यालयात जात असताना अज्ञात ट्रकचालकाने भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या दुचाकीसह खाली पडल्या.





