‘डिजिटल अरेस्ट’ करून दीड कोटींची फसवणूक

पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या नावाने ‘विश्वास’ घात

* आरोपींना मध्य प्रदेशातल्या इंदोर येथून अटक

नागपूर /1 नोव्हेंबर : शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय ते पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याने गुन्हेगारी विश्वातही त्यांच्या नावाचा दरारा आहे. मात्र त्यांचाच फोटो आणि आवाजाची नक्कल करत दोन भामट्यांनी एकाला डिजिटली अटक केली. या दोघांनी नंतर 1 कोटी 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार अलिकडेच घडला होता.
या प्रकरणात एक्शन मोडवर आलेल्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने तडकाफडकी दोघांना खराखुरी अटक केली. दिनेश अवाभाई रावरीया (32) व अरविंद कानजी गाला (45) अशी या भामट्यांची नावे आहेत.दीनदयाळ नगरातील प्रविरकुमार तालुकदार यांना काही दिवसांपूर्वीच एक फोन आला. फोन करणार्‍याने प्रविरकुमार यांना आपण पोलीस आयुक्त असल्याचे सांगितले. दरम्यान त्याने एनआयएचे अधिकारी प्रदीप जैस्वाल बोलणार असल्याचे सांगून भीती दाखवली. या दोन भामट्यांनी चक्क पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि जयस्वाल यांच्या फोटोचा गैरवापर केला होता. प्रविरकुमार यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो वापरून व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटली ‘ अटकेत ठेवले. त्यानंतर एनआयएचे प्रदीप जैयस्वाल यांच्या नावे भीती घालून भामट्यांनी 1 कोटी 4 लाख रुपये आरटीजीएस द्वारे पाटवण्यास भाग पाडले. अखेर या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. या घडामोडीत सायबर सेलच्या अन्य पथकांनी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इंदोर येथे छापे टाकत दोघांना अटक केली. दुर्गाकुमार भगत बहादुर (36) आणि नेतराम श्रीराम चडार (29) अशी भामट्यांची नावे आहेत. हिवरी लेआउट येथील निखील नखत यांच्या वडिलांना व्हॉ़ट्सअपवर एका प्रतिष्ठिताचा फोटो लावून भामट्यांनी संपर्क केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेत ठगबाजांनी आवाजाची नक्कल करत नखत यांची दिशाभूल केली.

Back to top button