सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच

शिंदेसेनेची भूमिका ठरणार निर्णायक

सातारा/4 नोव्हेंबर : सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला 9, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांना आणखी दोन ते तीन संचालकांच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याने चार जागा जिंकलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
संख्याबळात तुलनेने कमी असलेल्या शिंदेसेनेची भूमिका अध्यक्षपदाच्या निवडीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.टेक्निकली राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात असणारे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे दोन संचालक शिंदेसेनेत आहेत. याशिवाय शंभूराज देसाई आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या मंगल पाटील हेही शिंदेसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे या चारही संचालकांना आपल्या बाजूने वळवणे भाजपसाठी कठीण टास्क ठरणार आहे. गुलाल घेऊनच जिल्हा बँकेत येण्याची सातार्‍यात प्रतिज्ञा करणार्‍या जयकुमार गोरे यांच्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक सोपी असणार नाही.

Back to top button