विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, उपमुख्यमंत्री शिंदेंचे शेरोशायरीतून स्वागत

मुंबई/1 जुलै- विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आज शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. सचिन अहिर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज (1 जुलै) उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार होती. मात्र अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसेच इतर नेत्यांनी आपल्या भाषणातून सचिन अहिर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दरम्यान, उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड झाली. विरोधी पक्षाचे आभार मानतो की, त्यांनी सभागृहाचा मान राखून प्रस्ताव मागे घेतला. सन 1999 मध्ये मी आणि सचिन अहिर सोबत निवडून आलो होतो. सचिन अहिर निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उपसभापतीपदाच्या निवडीपूर्वी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीचा इतिहास सांगितला. आजवर उपसभापतीपदासाठी निवडणूक झालेली नाही. उमेदवाराची सर्वांच्या सहमतीने निवड केली जाते, असे सांगितले. यानंतर ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहिर केले. अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घेतल्या नंतर विधानपरिषदेत सचिन अहिर यांच्या उपसभापती पदाच्या निवडीच्या प्रस्ता वाला एकमताने मंजूरी देण्यात आली. उपासभापती पदाच्या खुर्चीवर बसल्यावर प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो. सचिन अहिर ती कामं करतील. आतापर्यंत उपसभापती म्हणून ज्यांनी काम केलं त्या निलम गोर्‍हे यांचे देखील अभिनंदन करतो. प्रसंगी कठोर भूमिका घेणार्‍या त्या आहेत. मधल्या काळात संघर्षाचा काळ होता, त्यावेळी देखील त्यांनी चांगलं काम केलं. सचिन अहिर यांची कारकीर्द म्हणजे चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता अशी ओळख आहे.

संबंधित बातम्या

Back to top button