विजय वडेट्टीवार यांच्या कन्येचे वय कमी भरल्याने विधानपरिषद निवडणुकीतून माघार

15 दिवसांपूर्वीच झाले लग्न; आता वय आड आले आणि आमदारकीची संधी गेली

नागपूर /25 मे: चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी वय एक महिना कमी भरत असल्याने माघार घेतली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 वर्षे असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, शिवानी वडेट्टीवार यांचे वय या निकषात अवघ्या एक महिन्याने कमी पडत असल्याचे समोर आले. कोणतीही कायदेशीर किंवा तांत्रिक अडचण भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी या निवड णुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. वयाची ही अट पूर्ण होत नसल्यानेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे पक्षांतर्गत गोटातून सांगण्यात आले. या मतदारसंघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच या तांत्रिक कारणामुळे त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लागला आहे. शिवानी वडेट्टीवार यांच्या माघारीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवानी यांनी घेतलेली माघार म्हणजे महाविकास आघाडीची माघार अजिबात नाही. ही केवळ एका उमेदवाराची तांत्रिक अडचणआहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून, अद्याप उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.भाजपच्या धनशक्तीवर वडेट्टीवारांचा प्रहार-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या निवडणुकीत एकीकडे प्रचंड धनशक्तीचा वापर केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button