24 कोटींचा गंडा! ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली निवृत्त शिक्षिकेला लुटले
6 जणांना बेड्या

बंगळुरु/25 मे -कर्नाटकात निवृत्त शिक्षिकेला बनावट सीबीआय अधिकारी बनून 24 कोटींचा गंडा घालण्यात आला. पोलिसांनी 6 राज्यांतून 6 आरोपींना अटक करत 5.46 कोटी रुपये वाचवले. कर्नाटक राज्यात सायबर गुन्हेगारीचा एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे बनावट अधिकारी बनून एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला तब्बल 24 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कर्नाटकच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत वेगवेगळ्या राज्यांतून 6 आरोपींना अटक केली असून, सुमारे 5.46 कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवले आहे.
दुबईहून परतलेल्या शिक्षिकेला केले टार्गेट-फसवणूक झालेली महिला बेंगळुरूमधील शिवाजीनगर येथील रहिवासी असून, तिने पूर्वी दुबईत शिक्षिका म्हणून काम केले होते. अमेरिकेत राहणार्या आपल्या मुलांकडे स्थायिक होण्यासाठी तिने बेंगळुरू आणि मुंबईतील काही मालमत्ता विकल्या होत्या. तिच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती मिळताच सायबर भामट्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले.
काय आहे ‘डिजिटल अरेस्ट’ आणि कशी झाली फसवणूक?-आरोपींनी महिलेशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत, तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडलेले आहे, अशी भीती त्यांनी घातली.




