उष्णतेमुळे 500 वटवाघुळांचा मृत्यू

गडचिरोली/25 मे-राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेमुळे 500 हून अधिक वटवाघुळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा मृत्यू झाल्याने वनविभागासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत




