जमिनीच्या वादावरून गोळीबार; भावाला अटक
बागेेशर बाबा यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले

नवी दिल्ली/15 जुलै ; बागेेशर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाला मध्य प्रदेशपोलिसांनी अटक केली आहे. एका जमिनीच्या वादावरून गोळीबार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अंकित मिश्रा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून, अन्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहेछतरपूर जिल्ह्यात जमिनीच्या वादाप्रकरणी पोलिसांनी बागेेशर महाराज यांचा भाऊ शालिग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा याला अटक केली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना
राजनगर न्यायालयात हजर करण्यात आले. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडा गावातील रहिवासी मोतीलाल कुशवाहा यांनी आरोप केला आहे की, ते आपल्या मित्रांसोबत गावात होते. त्याचवेळी शालिग्राम गर्ग त्याचे साथीदार सतीश, आशिष आणि आणखी एका व्यक्तीसह तेथे आला. त्यांनी तात्काळ शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेदरम्यान तीन वेळा गोळीबारही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बागेेशर बाबा धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया समोर आली.या घटनेनंतर बागेेशर महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे. शालिग्राम गर्ग यांच्याशी काही घेणे-देणे नाही. गेल्या तीन वर्षांपासून संपर्क नाही. छतरपूर जिल्हा खूप मोठा आहे. त्या ठिकाणी
काही ना काही घडत असते. कायदेशीर कारवाई व्हावी. कायद्याने जी शिक्षा असेल, ती द्यावी. कठोरात कठोर शासन व्हावे. संबंधित कुटुंबाचा आणि माझा संबंध नाही. मी समाजासाठी, राष्ट्रासाठी काम करत आहे. सगळे विेश माझे कुटुंब आहे, असे बागेेशर बाबा म्हणाले. तसेच या प्रकरणाशी माझा संबंध जोडू नये, असे आवाहन बागेेशर महाराजांनी केले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस या व्हायरल व्हिडिओंचीही चौकशी करत आहेत. हे प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित असून, राजनगर पोलीस ठाण्याने कारवाई केली आहे. तपास सुरूआहे. शालिग्राम गर्ग यांचे नाव यापूर्वी अनेक वादांमध्ये आले आहे. पिस्तूल
दाखवणे, धमक्या देणे, लोकांना मारहाण करणे आणि टोल कर्मचार्यांशी वाद घालणे असे आरोप आहेत.




