राम मंदिरात श्रद्धेने दान दिले नाही म्हणून चोरीला गेले; यूपी विधानसभा अध्यक्षांचे विधान

नवी दिल्ली/15 जुलै -ज्या मंदिराचा 500 वर्षांचा संघर्ष सुरू आहे, त्या मंदिरासाठी लाखो रामभक्तांनी भक्तिभावाने पैसा दान केला आहे. हे दान नाही. हे देवाने दिलेले आहे आणि देवाच्या चरणी समर्पित आहे. लाखो रामभक्तांचा पैसा मंदिरात गुंतवला गेला आहे. आपण मंदिराचे भव्य आणि दिव्य रूप पाहू शकतो, असे सांगतानाच राम मंदिरात श्रद्धेने दान दिले नाही
म्हणून चोरीला गेले, असे विधान उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी केले आहे. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात नवनवे खुलासे होत असताना सतीश महाना यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात झालेल्या देणग्यांच्या कथित चोरीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी 1.11 लाख रुपयांची देणगी दिली होती. देणगी
चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत बोलताना सतीश महाना म्हणाले की, जर त्यांनी काही पैसे दान केले असतील आणि त्यांना ते परत हवे असतील,
तर रामाचा भक्त म्हणून मी माझ्या खिशातून त्यांचे पैसे परत करण्यास तयार आहे.माझा विेशास आहे की, देवाच्या चरणी अर्पण केलेला पैसा त्या मंदिरात गुंतवला गेला आहे. मला एक भव्य मंदिर बांधले जात असल्याचे दिसत आहे. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान राम मंदिर बांधण्यासाठी दिग्विजय सिंग यांनी पदयात्रा काढली असती, तर मला अधिक आवडले
असते. कदाचित ती एक चांगली गोष्ट ठरली असती. ज्यांना त्यांचे पैसे परत हवे आहेत, ते राम मंदिरासाठीच्या देण्यात आलेल्या दानाबाबत चिंता का करत आहेत?, असा सवाल महाना यांनी केला. राम मंदिरात श्रद्धेने दान दिले नाही म्हणून चोरीला गेले.ही एक बाजू आहे. मला वाटते की ज्यांचे पैसे चोरीला गेले, त्यांनी ते मंदिरात खर्या भक्तीने, श्रद्धेने अर्पण केले नसतील. म्हणूनच
त्यांचे पैसे चोरीला गेले. आमचे पैसे चोरीला गेलेले नाहीत. आमचे पैसे मंदिरात गुंतवलेले आहेत. मंदिराचे भव्य स्वरूप त्याचाच पुरावा आहे, असे महाना यांनी म्हटले आहे. दरम्यान, दुर्दैवाने, प्रत्येक वर्गात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समाजात असे
लोक आहेत. या देशात मंदिरात दान चोरी होण्याची ही काही पहिलीच वेळ आहे का? आपण ज्या संस्थांमध्ये काम करतो, ज्या व्यवसायांमध्ये काम करतो, आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या घरांमध्ये अशा गोष्टी घडल्या नाहीत का? ज्यांनी हे केले आहे, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. त्यांनी पाप केले आहे आणि त्यांना शिक्षा होईल. कायदा त्यांना शिक्षा देईल. त्यांची
सुटका होणार नाही, असे महाना यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.




