अणुऊर्जा प्रकल्पाची गोपनीय माहिती चोरीला
रलायन्स’कडे असणार्या भारताच्या सर्वात मोठ्या

डार्क वेबवर हजारो सीक्रेट फाईल्स लीक
नवी दिल्ली/15 जुलै : देशातील सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तावेज रॅनसमवेअर ग्रुप वर्ल्ड लीक्सनं डार्क वेबवर शेअर केले आहेत. यामध्ये अणु ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित ब्लूप्रिंट, सप्लायर्सची माहिती, बैठकांचा तपशील आणि विमा दस्तावेज यांचा समावेश आहे. तामिळनाडूतील कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित हजारो संवेदनशील दस्तावेज लीक झाले आहेत. या प्रकल्पाशी संबंधित 19 हजारांहून अधिक दस्तावेज उघड सार्वजनिक केल्याचा दावा वर्ल्ड लीक्सनं केला आहे. यामुळे देशातील सर्वात मोठ्या अणु ऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सायबर
सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. लीक करण्याचत आलेले दस्तावेज 8.58 लाख फाईल्सच्या डेटा सेटचाभाग आहेत. या प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदार रिलायन्स समूहाकडून चोरण्यात आलेला आहे. रिलायन्स समूहानं रॉयटर्स वृत्तसंस्थेसोबत बोलताना थर्ड पार्टी डेटा सेंटर प्रोव्हायडर ’योटा’च्या सर्व्हरवर डेटा उल्लंघनाला दुजोरा दिला आहे. याची माहिती सरकारला देण्यात आली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कोणकोणत्या डेटाला याचा फटका बसला आहे, त्याची माहिती कंपनीकडूनदेण्यात आलेली नाही. रॉयटर्सकडून 2016 ते 2025 पर्यंतच्या दस्तावेजांची समीक्षा करण्यात आली. लीक झालेल्या
फाईल्समध्ये वेंटिलेशन आणि कूलिंग सिस्टिम इंजिनीअरिंग ब्लूप्रिंट, कॉमन कंट्रोल रुमचं फ्लोअर लेआऊट, उपकरणांचे निरीक्षण अहवाल, पुरवठादारांची यादी, वेंडर प्रस्ताव, बैठकांच्या नोदी आणि विम्याशी संबंधित दस्तावेजांचा समावेश आहे. बहुतांश दस्तावेज कुडनकुलम अणु प्रकल्पाच्या युनिट-3 आणि युनिट-शी संबंधित आहे. त्यांची उभारणी सुरू आहे. ते 2027 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. लीक झालेल्या डेटामध्ये अणु प्रकल्पाच्या कोअर सिस्टिमच्या डिझाईनचा समावेश नाही. कोअर सिस्टिमचं डिझाईन रशियाची सरकारी कंपनी रोसाटॉम उपलब्ध करुन देणार आहे.अणु ऊर्जा प्रकल्पाशी गोपनीय दस्तावेज लीक झाल्यानं प्रकल्पाला गंभीर स्वरुपाचा धोका निर्माण झाल्याचं अणु ऊर्जेवर काम करणारी संघटना न्युक्लिअर थ्रेट इनिशिएटिव्हचे सीनियर डायरेक्टर निकोलस रोथ यांनी सांगितलं. प्रकल्पापर्यंत कोणाला पोहोचता येतं, त्यांना कोणकोणत्या यंत्रांपर्यंत जाता येतं, याची माहिती शत्रूंना लीक झालेल्या दस्तावेजातून मिळू शकते, असा धोका त्यांनी बोलून दाखवला.
यामुळे हल्लेखोराला फायदा होऊ शकतो.




