मंत्री करणं ही माझीच चूक ठरल बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रहारच्या कार्यकर्त्यांसमोर ठाकरे भडकले, थेट निशाणा

मुंबई/22 मे- प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताच बच्चू कडू यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं. शिंदे शिवसेनेतून आमदार झालेल्या बच्चू कडूंवर पहिल्यांदाच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. लोभापायी गेलेत ते जाऊ द्या, असा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंवर प्रहार केला आहे.
बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आमदारकी मिळवली होती. पण, प्रहार संघटना ही सुरूच राहणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत‘मातोश्री’ येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यातून जो गेला, तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, याचा आनंद आहे. बच्चू कडूंनी आपल्याला विकून टाकलं आणि मिंधे सेनेत प्रवेश केला. आपण स्वाभिमानी असल्याने ठाकरेंच्या सोबत आलो आहोत. यापुढे नेहमी ठाकरेंच्या सोबत राहू, असे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर कार्यकर्त्यांनी म्हटलं, महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंना राज्यमंत्री केले होते. तेव्हा प्रहारचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल, असे दोन आमदार होते. बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. पण, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू हे गुवाहाटीला सोबत गेले होते. तसेच, बच्चू कडूंसाठी एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली होती. परंतु, भाजपचे प्रविण तायडे यांनी बच्चू कडूंचा पराभव केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेवर आमदार बनवत ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button