आपली नदी-आपली जबाबदारी’, अभियानाची जनआंदोलनाकडे वाटचाल
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्यांनी केली पाहणी

स्वच्छता अभियानात अकोलेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
अकोला/10एप्रिल- आपली नदी आपली जबाबदारी या स्वच्छता अभियानांतर्गत अकोला शहरात सध्या स्वच्छतेचे मोठे लोण पसरले असून या मोहिमेने आता खर्या अर्थाने जनआंदोलनाचे रूप घेतले आहे. या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अकोल्याचे खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, महानगरपालिका सभापती विजय अग्रवाल, भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदा खेडकर तसेच जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी आज कार्यक्रम स्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. नदीपात्रातील गाळ आणि साचलेला कचरा उपसण्याच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज झाली असून लोकप्रतिनिधींनी देखील प्रत्यक्ष मैदानात उतरून उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे. अकोल्याची जीवनवाहिनी असलेल्या या नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण पाहणी दौर्यात किशोर मांगते पाटील, अमोल गोगे, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, पवन महल्ले, सागर शेगोकार, संदीप गावंडे, तुषार भिरड, अमोल गीते, गोपाल मुळे, रणजीत खेळकर, संतोष पांडे, राजेंद्र गिरी, शरद तुरकर, मनीष बुंदेले, वैशाली शेळके, आरती घोगलिया, चंदा शर्मा, कल्पना गोटफोडे, प्राची काकड, रंजना विंचनकर, डॉक्टर राजू देशपांडे, डॉक्टर अभय जैन, डॉक्टर सुजित फोकमारे, डॉक्टर नरेश गौळ, डॉक्टर तुषार मालोकार, डॉक्टर अजय चव्हाण, नितीन ताकवले, संदीप शेगोकार, संतोष डोंगरे, विनोद मनवाणी, योगिता पावसाळे, विनोद मापारी आणि संजय बडोणे यांसह मनपाचे सर्व महानगर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या कानाकोपर्यातून आलेल्या या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी स्वच्छतेचा जणू विडाच उचलला आहे. नदी पात्र स्वच्छ झाल्यास शहराचे आरोग्य सुधारेल आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे होतील, या हेतूने राबवल्या जाणार्या या अभियानात डॉक्टर, वकील, व्यापारी आणि सामान्य नागरिकही हिररीने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली असून कामाच्या ठिकाणी उत्साह ओसंडून वाहत होता. ही मोहीम केवळ औपचारिक नसून नदी पूर्णपणे प्रवाही होईपर्यंत अखंडपणे सुरू राहील, असा निर्धार याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. अकोलेकर जनतेने या कार्यात स्वतःला झोकून दिले असून गावोगावी या मोहिमेची मोठी चर्चा होताना दिसत आहे. नदीकाठी जमलेल्या या अफाट जनसमुदायाने स्वच्छतेचा नवा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे.
नदी स्वच्छतेचा महान संकल्प-आपली नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक अकोलेकराचे पवित्र कर्तव्य आहे




