नाशिक भोंदूबाबा प्रकरण! मंत्रालयातील अधिकारीही सहभागी

नाशिक– नाशिमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणा वरुन राजकीय वाता वरण चांग लच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशोक खरात प्रकरणी उद्या आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. खरात प्रकरणी राज्य सरकारनं खुलासा केला पाहिजे. महिला असल्यानं रुपाली चाकणकरांना टार्गेट केल्या जातंय का? मंत्र्यांचे ही राजीनामे घेतील का? असा सवाल पटोलेंनी केला आहे. मंत्रालयातील अधिकार्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला.




