हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीचा मानकरी

पुणे-पुण्यातील वाघोलीत झालेल्या 68 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्याला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीरनं 68 वं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलीय. पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीरने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चीतपट करत मानाची चांदीची गदा पटकावली आहे. हर्षवर्धनने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला.




