मालकाला नोकरानेच घातला तब्बल 3 कोटी 5 लाखांचा गंडा

व्यापार्‍याच्या अगतिकतेचा फायदा घेत तब्बल 4 वर्षे लुबाडणूक

* पत्नी, मेहुणी अन् जावयासह 6 जणांवर गुन्हा दाखल

वरुड / 22 मार्च : ज्या हाताने पगार घेतला, त्याच हाताने मालकाच्या विश्वासाचा गळा घोटल्याचा खळबळजनक प्रकार वरुडमध्ये उघडकीस आला आहे. युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांच्या अगतिकतेचा फायदा घेत, त्यांच्या अत्यंत विश्वासू नोकराने आपल्या संपूर्ण कुटुंबासह संगनमत करून तब्बल 3 कोटी 5 लाख 88 हजार 960 रुपयांचा महाप्रचंड ’गंडा’ घातला आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वरुड पोलिसांनी मुख्य आरोपी गोपाल चौधरी याच्यासह त्याच्या पत्नी, बहीण, जावई आणि भाच्यावर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील नामांकित व्यापारी लोकेश संतोष अग्रवाल यांच्या ’श्री गजानन मंदिर’ परिसरातील ’लोकेश ट्रेडर्स’ मध्ये गोपाल रामकृष्ण चौधरी (40) हा अनेक वर्षांपासून नोकरीला होता. अग्रवाल यांचे वडील नागपूर येथे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना, लोकेश अग्रवाल यांचे दुकानावरील लक्ष काहीसे विचलित झाले होते. मालकाच्या या कौटुंबिक संकटाचा फायदा घेत गोपालने दुकानाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे षडयंत्र रचले. 22 सप्टेंबर 2021 ते 8 डिसेंबर 2025 या चार वर्षांच्या काळात त्याने अग्रवाल यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून थेंबे थेंबे नव्हे, तर लाखांच्या पटीत रक्कम आपल्या आणि नातेवाईकांच्या खात्यात वळती केली. केवळ स्वतःच्याच खात्यात नाही, तर गोपालने आपल्या पत्नीच्या (अश्विनी चौधरी) नावावर असलेल्या आयडीबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या खात्यात, तसेच मेहुणी वंदना गुल्हाने यांच्या नांदगाव पेठ येथील खात्यात पद्धतशीरपणे पैसे ट्रान्सफर केले. या चोरीच्या पैशातून आरोपींनी

संबंधित बातम्या

Back to top button