प्रा.दीपाली गवई ’माता रमाई’

अमरावती /11 मार्च : आंबेडकरवादी विचारांचा जागर करणार्‍या अमरावतीतील विदुषी प्रा. दीपाली गवई यांचा सामाजिक आणि साहित्यिक योगदानाबद्दल ’माता रमाई’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ’मी रमाई बोलतेय’ या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रमाईंचा लढाऊ बाणा जनमानसापर्यंत पोहोचवला असून, महिला दिनाच्या महोत्सवात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापिका दीपाली गवई यांना आंबेडकरवादी चळवळीतील मानाचा ’माता रमाई’ पुरस्कार देण्यात आला. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तथा प्राचार्य डॉ. कमलाकर पायस यांच्या शुभहस्ते हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी डॉ. राव, डॉ. सचिन पंडित, प्रा. डॉ. दीपाली पडोळे आणि प्रा. मेघा चिमणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. जलदा ढोके, प्रा. डॉ. वामन गवई, प्रा. डॉ. वसंत शेंडे, संजय मोखडे, सुदामभाऊ सोनुले, प्रा. डॉ. सीमा मेश्राम-मोरे, मायाताई वासनिक-गेडाम, धर्मशील गेडाम, विलास थोरात, आर. एस. तायडे, सिद्धार्थ गेडाम, पुष्पाताई बोरकर, प्रा. डॉ. गजानन बनसोड, शरद मोरे आणि प्रा. विनय सोनुले यांसारख्या अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button