निमा अमरावतीचा ब्लॉसम सांस्कृतिक महोत्सव

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अमरावती / 7 मार्च : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अमरावतीच्या वतीने आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सव ब्लॉसम 2026 हा कार्यक्रम नुकताच सिपना कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, बडनेरा रोड येथील ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. डॉक्टर, त्यांच्या कुटुंबीयांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगतदार ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दिनेश गवळी (माजी अध्यक्ष, चउखच् मुंबई), डॉ. राम खरबडे (चेअरमन) यांच्यासह निमा अमरावतीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण औगड, सचिव डॉ. पंकज कावरे, डॉ. विजय अजमिरे (जॉइंट सेक्रेटरी, छखच- ऑल इंडिया), डॉ. कमल राऊत, डॉ. राजेश उताणे, डॉ. अनिल बाजारे, डॉ. अनिल जावरकर, डॉ. आशिष येवतीकर, डॉ. प्रिया चौधरी, डॉ. प्रेमा चौधरी, डॉ. रुपाली कावरे, डॉ. स्वाती टोंगळे, डॉ. अमोल ठवळी, डॉ. उन्मेश डालके, डॉ. आकाश चांगोले, डॉ. राधा नाईक, डॉ. विजय खंडारे, डॉ. सागर सांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी माँ जिजाऊ – डॉ. प्रांजली उमप, छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. वैभव ढवळे आणि सईबाई – डॉ. शिल्पा ढवळे यांनी साकारलेल्या भूमिका विशेष आकर्षण ठरल्या. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र तायडे, डॉ. रविंद्र बारसकर आणि डॉ. प्रवीण मोहोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कु. वसुंधरा वानखडे, श्रीधन तुषार पोहनकर, मानद हर्षवर्धन नवले, अद्विक उज्ज्वल बारंगे, कु. रिया राहुल भटकर आणि कु. शर्वरी प्रवीण मोहोड या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये किड्स डान्स, महिलांचे नृत्य, कपल डान्स, पुरुषांचे नृत्य, स्किट, नाटिका, फॅशन शो, फिश पाँड तसेच ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमाचा समारोप सर्वांसाठी आयोजित स्नेहभोजनाने करण्यात आला.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांनी मोलाचे योगदान दिले. स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. अंकुश मानकर, फूड कमिटीचे अध्यक्ष डॉ. विनोद मेत्रे, स्टेज कमिटीचे अध्यक्ष डॉ. धीरज इसोकार तसेच कल्चरल कमिटीचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल घाटोळ यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सोशल मीडिया समन्वयक म्हणून डॉ. परिस उंडे यांनी काम पाहिले.ब्लॉसम 2026 महोत्सवाचे आयोजन डॉ. राम खरबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सह-अध्यक्ष म्हणून डॉ. प्रेमा चौधरी, डॉ. वैभव ढवळे आणि डॉ. अमोल ठवळी यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाबाबत बोलताना निमा अमरावतीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण औगड यांनी सर्व डॉक्टर सदस्य, आयुर्वेद मंच, महिला मंच आणि आयोजन समितीचे आभार मानले. डॉक्टरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोजनादरम्यान अनावधानाने कोणाला त्रास झाला असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत सर्वांनी एक कुटुंब म्हणून एकत्र राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button