राहुल नगरात डमी अश्रुधुराने दाणादाण
धुरामुळे पोलिसांची मोठी पळापळ

दोन अल्पवयीन मुलांची पोलीस चौकशी
अमरावती /22 फेब्रुवारी : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या राहुल नगर परिसरात शनिवारी एका विचित्र घटनेमुळे प्रचंड थरार निर्माण झाला.
एका अल्पवयीन मुलाने राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपी) मैदानावरून आणलेली डमी अश्रूधुराची नळकांडी कुतूहलापोटी घरात फोडली. यातून निघालेल्या उग्र धुरामुळे संपूर्ण वस्तीत घबराट पसरली असून, घरातील सदस्यांसह रस्त्यावरून चालणार्या लोकांच्या डोळ्यांची आग होऊन पाणी येऊ लागल्याने मोठी अफरा-तफर उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमरावती येथील राहुल नगर भागात शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना अचानक एका घरातून दाट धूर बाहेर येऊ लागला. हा धूर साधा नसून त्याचा संपर्क येताच लोकांच्या डोळ्यांत आणि नाकात प्रचंड जळजळ होऊ लागली. बघता बघता हा वायू संपूर्ण परिसरात पसरला आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सैरावैरा धावपळ सुरू झाली. नेमका काय प्रकार घडला हे कुणालाच समजत नसल्याने परिसरात काही काळ युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील एक प्रतिनिधी/22 फेब्रुवारी
अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या राहुल नगर परिसरात शनिवारी एका विचित्र घटनेमुळे प्रचंड थरार निर्माण झाला.
एका अल्पवयीन मुलाने राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपी) मैदानावरून आणलेली डमी अश्रूधुराची नळकांडी कुतूहलापोटी घरात फोडली. यातून निघालेल्या उग्र धुरामुळे संपूर्ण वस्तीत घबराट पसरली असून, घरातील सदस्यांसह रस्त्यावरून चालणार्या लोकांच्या डोळ्यांची आग होऊन पाणी येऊ लागल्याने मोठी अफरा-तफर उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमरावती येथील राहुल नगर भागात शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना अचानक एका घरातून दाट धूर बाहेर येऊ लागला. हा धूर साधा नसून त्याचा संपर्क येताच लोकांच्या डोळ्यांत आणि नाकात प्रचंड जळजळ होऊ लागली. बघता बघता हा वायू संपूर्ण परिसरात पसरला आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सैरावैरा धावपळ सुरू झाली. नेमका काय प्रकार घडला हे कुणालाच समजत नसल्याने परिसरात काही काळ युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील एक अल्पवयीन मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी ’एसआरपी’च्या मैदानावर गेला होता. तिथे त्याला पोलिसांच्या सरावासाठी वापरली जाणारी एक डमी अश्रूधुराची नळकांडी पडलेली आढळली. केवळ गंमत म्हणून हा मुलगा ती नळकांडी उचलून घरी घेऊन आला. घरी आल्यावर त्याने ती फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अचानक दाट धूर बाहेर फेकला गेला. धुराचा त्रास इतका तीव्र होता की, घरातील माणसे तातडीने घराबाहेर पळाली. तसेच रस्त्यावरून जाणार्या वाटसरूंच्या डोळ्यांतही अचानक पाणी आल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तिथे बघ्यांची शेकडोच्या संख्येने गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या खोडसाळपणामुळे वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अशा वस्तूंशी खेळणे किती महागात पडू शकते, याचीच प्रचिती या घटनेतून आली आहे.




