मनपा क्षेत्रातील रमाई आवास योजनेच्या दुसरा टप्पा वितरणासाठी 28.84 कोटींच्या निधी वितरित
आ.सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

* अर्थसंकल्पिय तरतुदीचा अमरावतीला प्रत्यक्ष लाभ मिळाल्याबद्दल ना. अजितदादा पवार यांचे मानले आभार
अमरावती /7 जानेवारी : अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील रमाई आवास योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेच्या दुसर्या टप्यातील अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. अमरावतीच्या आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याने आता अमरावती महापालिका क्षेत्रात रमाई आवास योजनेच्या कामांना गती देण्यासाठी शासनाकडून 28.84 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून शहरी भागात अर्धवटरीत्या रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या कामांना गती मिळणार असल्याने लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबद्दल आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
अमरावती महानगर पालिकेने वर्ष 2025 मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत 2,000 लाभार्थ्यांचे उद्दिष्टय ठेवून यादीला मंजुरी दिली होती. या करिता साधारणतः 50 कोटींची आवश्यकता असल्याने अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अशातच गेल्या मार्च 2025 चा अर्थसंकल्प मांडत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांनी रमाई आवास योजनेकरिता अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली. तसेच रमाई आवास योजनेच्या कामासाठी अमरावती महापालिकेला टप्याटप्याने निधी मिळणार असल्याने त्यापैकी एप्रिल 2025 मध्ये पहिल्या हप्त्यात अमरावती महानगर पालिकेला रमाई आवास योजनेकरिता 21.16 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. सदर निधीतुन लाभार्थ्यांच्या खात्यात आरटीजीएस प्रणाली द्वारे योजनेचा प्रथम हप्ता जमा होताच शहरात रमाई आवास योजनेच्या कामांना गती मिळाली. अमरावती शहरातील लाभार्थ्यांना प्रथम टप्प्यात 21.16 कोटींचे वाटप झाल्यानंतर ज्यांचे योजनेच्या निकषाप्रमाणे सज्जा -लेंटर पर्यंत बांधकाम झाले आहेत, अशा 806 लाभार्थ्यांचे रमाई आवास योजनेची कामे प्रगतीपथावर असतांना लाभार्थ्यांना आता दुसर्या टप्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती. या संदर्भात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती महानगर पालिका आयुक्तांशी चर्चा करून या संदर्भात उर्वरित निधी प्राप्त होण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. महापालिकेकडून तसा प्रस्ताव पाठविण्यात आल्या नंतर आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून राज्याच्या अर्थसंकल्पिय तरतुदीनुसार अमरावती महानगर पालिकेसाठी रमाई आवास योजनेचा उर्वरित 28.84 कोटींचा निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी पत्राद्वारे केली. दरम्यान या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना सुद्धा अवगत करण्यात आल्याने त्यांनी आयुक्त,समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना रमाई आवास योजनेचा निधी वितरित करण्यासंदर्भात निर्देशित केले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालय पुणे, यांनी कालच 6 जानेवारी 2026 रोजी अमरावती महानगर पालिका क्षेत्राकरिता रमाई आवास योजनेसाठी 28.84 कोटींचा निधी वितरित केला आहे. सदर निधीतुन रमाई आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या 806 लाभार्थ्यांच्या खात्यात आरटीजीएस प्रणाली द्वारे अनुदान जमा करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून शहरी भागात अर्धवटरीत्या रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या कामांना गती मिळणार असल्याने लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबद्दल आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.




