सोनल रंगारी यांची कराटे महाराष्ट्र संघ व्यवस्थापक म्हणून निवड

बडनेरा /14 डिसेंबर : महाराष्ट्र शासन अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचनालय,महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग तर्फे इंदोर मध्यप्रदेश येथे होणार्या 69 व्या राष्ट्रीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धे करिता सेन्साई सोनल रंगारी यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापन पदी निवड करण्यात आली.
सेन्साई सोनल रंगारी यांची या जबाबदारी च्या पदावर निवड झाल्या बद्दल एशियन पदक विजेते व कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे स चिव शिहान संदीप गाडे , अध्यक्ष शिहान सला उद्दीन अंसारी सर तसेच स्पोर्ट शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे सर,महासचिव अनवर अली सर, जिल्हा अँमुच्युर स्पोर्ट कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.खुशाल अडसपुर सर जिल्हा क्रीडा अधिकारी व प्रभारी उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग श्री गणेश जाधव सर, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने सर , राजेश वडते सर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे सर, वैशाली इंगळे मॅम, त्रिवेणी बांते मॅम,राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रफुल डांगे सर,स्वप्निल चांदेकर, रितेश अनंतवार, क्रीडा मार्गदर्शक व महाराष्ट्र संघ व्यवस्थापक राहुल निवडुगे, धनंजय भारसागडे सर, श्रीमती प्रणिती भिमटे ताई व शुभम मोहतुरे, शेख अकील, वैभव पातुर्डे, सागर बोरकर सर,रामपाल इंगळे तसेच बडनेरा शहरातील सर्वत्र गणमान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




