कमी मनुष्यबळातही विद्यापीठाचे कामकाज गतिमान

कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन, विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा

अमरावती/31मे: विद्यापीठाचे कामकाज अतिशय गतीने होत आहे, याचा अभिमान वाटतो आणि कर्मचारी सुध्दा अतिरिक्त प्रभार असतांनाही तितक्याच उत्साहाने आपली कामे करतात, त्यामुळे प्रशासकीय कामाची गतिशिलता कायम आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अरूण हरणे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी केमटेक विभागप्रमुख डॉ.ए.बी. नाईक, गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, महानुभाव अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. महंत सोनपेठकर, उपकुलसचिव (आस्थापना) मंगेश वरखेडे, सत्कारमूर्ती डॉ. संयोगिता विलास देशमुख, संजय धाकुलकर, संजय कोकाटे, आशिष शर्मा, संदिप ताथोडे, अनिल बुरघाटे, श्री प्रभाकर चाचरकर, जी.आर. पटके तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचेप्रेम मंडपे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, विद्यापीठात मनुष्यबळाची समस्या असूनही कर्मचारी कामाचा कोणताही ताण न घेता आपले काम जाणीवपूर्वक व जबाबदारीने करीत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजात गतिमानता आली असून प्रत्येक कर्मचार्‍याचा विद्यापीठाच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button