प्रभाताई आवारे यांचा वाढदिवस गो ग्रासतुला द्वारे साजरा

अमरावती/31 मे: वडाळी परिसरातील रहिवाशी माजी नगरसेविका सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई आवारे यांचा वाढदिवस डॉ. गोविंद कासट मित्र मंडळातर्फे गोरक्षण संस्थेत गोग्रासाठी गुडतुला व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी सुनील देशमुख सुदर्शन गांग प्रदीप जैन डॉ. राजू डांगे डॉ. गोविंद कासट श्रीकांत शेगोकार लक्ष्मण तडस दीपक दारव्हेकर प्राचार्य संजय शिरभाते धनंजय गूळदेकर विवेक अनुराधा यश सहस्त्रबुद्धे ईश्वर हेमने प्रतिभा रोडे शिला पाटील कांचन उल्हे शोभना देशमुख उमाकांत सुनंदा खरड डॉ. शोभा रोकडे डॉ. शोभा गायकवाड इत्यादी मंडळी हजर होती. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रभाताई आवारे यांचा शाल व पुस्तक प्रदान करून सत्कार करण्यात आला. संचलन आभार डॉ. गोविंद कासट यांनी मानले.

संबंधित बातम्या

Back to top button