थकीत मालमत्ता करापोटी राजमहल लॉन व मंगल कार्यालय सील

अमरावती /19 नोव्हेंबर: अमरावती महानगरपालिकेच्या पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत दस्तूरनगर येथील वॉर्ड क्रमांक उ8 मधील मालमत्ता क्रमांक 948, राजमहल लॉन व मंगल कार्यालय, गणपती नगर, चखऊउ रोड, अमरावती यांच्याकडे मालमत्ता कराची तब्बल 13 लाख 95 हजार 458 रुपये इतकी थकबाकी असल्याने महानगरपालिका प्रशासनाने आज दिनांक 19 नोव्हेंबर 2026 रोजी जप्तीनाम्यानुसार सदर मालमत्ता सील केली.
महानगरपालिकेच्या थकीत कर वसुली मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वारंवार थकीत कर भरण्याबाबत सूचना देऊनही रक्कम जमा न झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने जप्तीची कारवाई करत राजमहल लॉन व मंगल कार्यालयाला सील करण्यात आले. ही कारवाई मा. सहायक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहायक क्षेत्र अधिकारी प्रवीण ठाकरे, दीपक सरसे, आकाश चौधरी तसेच महानगरपालिकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. थकीत कराचा तातडीने भरणा करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Back to top button