ना.मेघना साकोरे-बोर्डीकर दोन दिवस जिल्हा दौर्यावर
आरोग्य केंद्रांसह वीज उपकेंद्रांची करणार पाहणी

महिला मेळाव्याला उपस्थिती; चिखलदरा येथे मुक्काम
अमरावती/19 नोव्हेंबर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक उपक्रम विभागाच्या राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर शुक्रवार, 20 नोव्हेंबरपासून अमरावती जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात त्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करणार असून, वीज उपकेंद्राची तपासणी आणि महिला मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत. आरोग्य सेवा, वीज व्यवस्था आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित कामांचा आढावा या दौर्यात घेतला जाणार आहे. दौर्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार, शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता त्या काटकुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता चुरणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करतील. दुपारी 12.30 वाजता चिखलदरा तालुक्यातील जारिदा येथील 33/11 केव्ही वीज उपकेंद्राची तपासणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता चुरणी येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर त्या चिखलदरा येथे रात्रीचा मुक्काम करतील. शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी त्या चिखलदरा येथील वन विभागाच्या विश्रामगृहात आरक्षित राहणार आहेत. त्यानंतर रविवार, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथे जाण्यासाठी रवाना होतील. राज्यमंत्री यांच्या या दौर्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, वीज व्यवस्था आणि महिला विकासाच्या कामांकडे लक्ष वेधले जाणार आहे.





