शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता पाच उमेदवार इच्छूक

युवा स्वाभिमान पार्टीच्या संपर्कात, पार्टी निवडणूक लढविणार

अमरावती /4 ऑक्टोबर : शिक्षक मतदार संघाची निवडणूक दिनांक 23 ऑक्टोबर 2026 ला होऊ घातलेली आहे.या निवडणुकीकरिता युवा स्वाभिमान पार्टी सज्ज झालेली आहे.
युवा स्वाभिमान पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये अनेक दिग्गजांनी उमेदवारी मागितली आहे या दिग्गजांमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती एडवोकेट प्रीतीताई रेवणे ,महानगरपालिकेचे गटनेता नगरसेवक प्राध्यापक नानाभाऊ आमले ,शिक्षण संस्थानिक तथा मोर्शी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनालीताई नवले ,आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते सोपान कांबळे,प्रा.प्रशांत वानखडे नगरसेवक व इतर चार ते पाच दिग्गजांनी उमेदवारीसाठी अथक प्रयत्न चालविली आहे .सर्व उमेदवारांची चाचपडनी युवा स्वाभिमान पार्टीचे सुनील भाऊ राणा यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली.या आढावा बैठकीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय सचिव जयंतराव वानखडे ,समाधान वानखेडे,अजयजी गाडे , प्रकाश साबळे,सुमतीताई ढोके,नगरसेवक दिपक साहू, नगरसेवक नंदा सावदे, नगरसेवक रजनी डोंगरे, नगरसेवक मीराताई कांबळे,अजय जयस्वाल, उपमहापौर सचिन भाऊ भेंडे ,विनोद जैस्वाल,किशोर जाधव,महेश मूलचंदानी,योगेश विजयकर,नगरसेवक अर्चना पांडे, नगरसेवक गौरी मेघवानी, नगरसेवक संजय हिंगलासपुरे, नगरसेवक प्रियंका पाटणे, नगरसेवक मीराताई कांबळे,नितिन बोरेकर,रवींद्र गावंडे,अशोक पांडे,सुरेंद्र वाघमारे,मनोज डहाके, व सर्व नगरसेवक उपस्थित होते. या उमेदवारांमधील एका उमेदवाराचे उमेदवारी निश्चित करून ही निवडणूक लढविल्या जाणार आहे या निवडणुकीत या युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारामुळे निवडणुकीचे चित्र अगदी स्पष्ट होणार आहे .युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्याचा चढता आलेख, लोक संपर्क ,शिक्षकांचे हाताळलेले प्रश्न, त्यांच्या सोडवलेल्या समस्या ,शिक्षकांच्या सतत संपर्कात असलेले आमदार व माजी खासदार यामुळे या निवडणुकीचे चित्र हे वेगळे राहणार आहे.

Back to top button