टेलिग्रामच्या वापरावर बंदी
पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई /16 जून -NEET-UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतात टेलिग्रामच्या वापरावर तात्पुरते निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून, ही बंदी 22 जूनपर्यंत लागू राहणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (छढअ) ने या निर्णयाचे स्वागत करत, विद्यार्थ्यांना दिशाभूल करणार्या आणि पेपरफुटीच्या अफवा पसरवणार्या संघटित रॅकेट्सविरोधातील ही आवश्यक कारवाई असल्याचे म्हटले आहे.NEET-UG 2026 ची पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. छढअ च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने टेलिग्रामवरील ‘मेसेज एडिट’ (संदेश संपादन) हे फीचरही 30 जूनपर्यंत भारतात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या फीचरचा गैरवापर करून काही चॅनेल्स आणि ग्रुप्सकडून परीक्षा संपल्यानंतर जुन्या पोस्टमध्ये प्रश्नपत्रिका जोडून त्या आधीच लीक झाल्याचा खोटा दावा केला जात असल्याचे छढअ ने स्पष्ट केले आहे अधिकार्यांच्या माहितीनुसार, काही टेलिग्राम चॅनेल्स परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांकडून हजारो ते लाखो रुपये उकळत होते. विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर ची महत्त्वाची भूमिका असल्याचे छढअ ने सांगितले. यापूर्वीच अनेक बनावट टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्स हटवण्यात आले आहेत.




