21 जूनला श्री हव्याप्र मंडळात रंगणार योग महा संगमचे भव्य आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी, पालक व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती /16 जून: आतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती अंतर्गत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती यांच्या वतीने दिनांक 21 जून 2026 रोजी योग महा संगम 2026 या भव्य योग संगम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील योगप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ठीक 7.00 वाजता डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार असून सर्व सहभागीांनी सकाळी 6.30 वाजेपर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदर योग महा संगम मध्ये मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान निर्मित कॉमन योग प्रोटोकॉल चे सामूहिक प्रात्यक्षिक सर्व सहभागींकडून करून घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने देशभरामध्ये राबविण्यात येणार्‍या योग उपक्रमाचा हा एक महत्त्वपूर्ण भाग असून योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचविणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
सन 2015 पासून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती अंतर्गत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीच्या योगशास्त्र विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये व समाजामध्ये योग बद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button