मोदींनी दहा वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं

फडणवीसांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुंबई/25 मे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जे लोक गरिबी आणि दारिद्रयरेषेखाली होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे दहा वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही, ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्यामुळे झालं, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या 12 वर्षांतील महत्त्वपूर्ण निर्णय आणि कारकीर्द उलगडणार्‍या पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांचे गौरवोद्गार काढले. देशातील 25 कोटी लोक जे गरिबी आणि अती दारिद्रयरेषेखाली होते, तीव्र गरिबीमध्ये होते ते गरिबीच्या रेषेवरती आले.

संबंधित बातम्या

Back to top button