10 नोव्हेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप?
पटेल-पवारांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई/6 नोव्हेंबर: प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी ह़ॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पवार रुग्णालयात दाखल होताच राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली…मात्र प्रफुल्ल पटेलांनी पवारांची भेट घेताच नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलयं…10 तारखेनंतर मुंबईत भेटू असा संवाद शरद पवार आणि पटेलांमध्ये झाला आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. पटेल-पवारांच्या भेटीत काय बोलणं झालं.
दरम्यान पटेल- पवारांच्या 10 तारखेनंतरच्या भेटीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनीही दुजोरा दिलाय…मात्र या भेटीला राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवारांमधील विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळणार्या दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आता नवा गौप्यस्फोट केलाय. दादा असते तर दोन्ही राष्ट्रवादीचं ठरल्यानुसार 12 फेब्रुवारीला विलिनीकरण झालं असतं, असं आता तटकरेंचं म्हणणयं. तर आधी आमचं म्हणणं फेटाळणार्या तटकरेंनीच आता सत्त समोर आण्याल्याचा टोला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लगावलाय. दुसरीकडे, या पटेल-पवार भेटीवर प्रतिक्रिया देताना शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी, ही भेट नवीन काहीतरी घडण्याचे संकेत देत आहे, असे सूचक विधान केलयं…तर, मविआ नेत्यांनी हा दावा फेटाळून लावलाय. .
मुळात शरद पवारांनी 10 नोव्हेंबरनंतर प्रफुल्ल पटेलांना भेटण्यास का सांगितलं? सुनील तटकरेंनी वेळ साधत याचं वेळी दादांची विलिनीकरणाबाबतची भूमिका का मांडली? विलिनीकरण होणार नाही, असं सांगणारे दादांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणावर पुन्हा का चर्चा करू लागलेत? 10 नोव्हेंबरनंतर खरचं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होताय





