मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलासा

मुंबई/5 नोव्हेंबर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांसाठी एक अत्यंत मोठी व दिलासादायक बातमी समोर आली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने सादर केलेला ’क्लोजर रिपोर्ट’ मंजूर केला आहे.
यामुळे मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातील 2022 मधील मनी लाँड्रिंगचे प्रकरण आता अधिकृतपणे संपुष्टात आले. विशेष पीएमएलए न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी स्पष्ट केले की, मनी लाँड्रिंग कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी आधी कोणताही मूळ गुन्हा असणे आवश्यक असते. जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मूळ गुन्हे आधीच रद्द केले आहेत, तेव्हा ईडीकडून पुढे कोणतीही कारवाई होणे शक्य नाही. या निर्णयामुळे न्यायालयाने ईडीने 4 एप्रिल 2022 रोजी दाखल केलेला तपास अहवाल रद्द केला असून, या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ईडी अधिकार्‍यांकडे परत करण्याचे आदेश दिले.

Back to top button