मनपा शिक्षकांच्या खात्यात दिवाळी पूर्वी 1.5 कोटी जमा
शिक्षक संघटनांची मनपा प्रशासनासोबतची बैठक यशस्वी

अमरावती/5 नोव्हेंबर : अमरावती महानगरपालिका शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बाबत शिक्षक संघटनांकडून वारंवार होत असलेली मागणी बघता मनपा आयुक्त श्री मंगेश गोंदावले यांनी संघटनासोबत दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी बैठक घेऊन संबंधित अधिकार्यांना आर्थिक समस्या दिवाळी पुर्वी निकाल काढण्याचे सूचित केले. या बैठकीस अमरावती महानगरपालिका लेखाधिकारी शिल्पा पवार मुख्य लेखापरीक्षक शामसुंदर देव , उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे, शिक्षणअधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम , संघटनांचे पदाधिकारी योगेश पखाले, सुधीर धोत्रे,अब्दुल तफज्जुल ,अजहर खान, मुख्तार अहमद, ऐफाजउल्ला खान, अतहर अहमद, विजया खुळे, प्रफुल्ल अनिलकर,अनुप भारंबे, सचिन सराड, विजया खुळे, कृष्णा ठाकूर हे उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा टप्पा दिवाळीपूर्वी जमा करण्याची तसेच सहावा वेतन आयोग थकबाकी लवकरात लवकर देण्याचे मनपा आयुक्त यांनी आश्वासित केले होते. त्याअनुषंगाने नुकतेच शिक्षकांच्या खात्यात सातवा वेतन आयोग थकबाकी तिसरा टप्पा करिता 90 लक्ष रुपये, तसेच सहावा वेतन आयोग थकबाकी करिता 29 लक्ष आणि दिवाळी अग्रीम करिता 23 लक्ष अशी एकूण 1 करोड 42 लक्ष रुपयाचे रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या मागण्या मान्य करून प्रलंबित समस्या तत्परतेने सोडविल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने तसेच संघटनांनी मनपा प्रशासनाचे तसेच महानगरपालिका कर्मचारी महासंघचे सचिव श्री आकाश तीरथकर यांचे आभार मानले आहे. तसेच दिवाळी पुर्वी आर्थिक समस्या सोडविल्याबद्दल शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





