वयोमर्यादा ओलांडणार्या MPSC परीक्ष्यार्थ्यांना नवी संधी
2027 पर्यंत नोकरी भरतीत 1 वर्षांची सवलत

मुंबई/5 नोव्हेंबर- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकर भरती परीक्षा देण्याची इच्छा असलेले आणि वयाची मर्यादा ओलांडणार्या उमेदवासांठी ही मोठी बातमी आहे. या उमेदवारांना चक्क एक वर्षाची सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
विशेष म्हणजे वयोमर्यादेची ही सवलत चझडउ आणि अन्य भरती यंत्रणांमार्फत राबवल्या जाणार्या सरकारी भरती परीक्षांनाही लागू आहे. याचा मोठा फायदा सरळसेवा भरतीची तयारी करणार्या उमेदवारांनाही मिळणार आहे. चझडउ भरती प्रक्रियेतील परीक्षा आणि नियुक्त्यांमधील अनिश्चितता तसेच विलंब याचा फटका बसून अनेक उमेदवार वयोमर्यादा संपल्याने स्पर्धेतून बाहेर फेकले जात आहेत. या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार कमाल वयोमर्यादा शिथिल करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. समितीच्या शिफारसीनंतर सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (5 नोव्हेंबर) याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार 1 जानेवारी 2026 पासून 5 नोव्हेंबर 2026 पर्यंत चझडउ ने ज्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत आणि त्यांच्या निवड प्रक्रियेचा एकही टप्पा झालेला नाही, अशा जाहिरातींसाठीही एक वर्षाची वयोमर्यादा सवलत लागू असेल. शिवाय 31 डिसेंबर 2027 पर्यंत प्रसिद्ध होणार्या सर्व सरकारी नोकरी भरतीच्या जाहिरातींसाठी ही सवलत लागू राहणार आहे.





