महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंनाच पसंती

आ.बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मुंबई/17 मे: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. यासाठी देवाला कशाला साकडे घालू, आता आम्ही थेट जनतेला साकडे घालू, असे वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू (यांनी केले आहे. आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राज्या तील मुख्यमंत्री पदाच्या चेहर्‍याबाबत पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शिवसेनेने शेतकर्‍यांबद्दलचे विभागवार धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात 15 मे रोजी मुंबईत काजू आणि आंबा उत्पादक शेतकर्‍यांसाठी एल्गार करण्यात आला. या आंदोलनात शेतकर्‍यांसाठी सर्व विरोधक एकटवले. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना फरफटत नेत गाडीत कोंबले. राजू शेट्टी यांना फरफटत नेण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर यांच्यासह मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबत विचारले असता राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यावर कारवाई करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचे तातडीने निलंबित करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली. आंदोलन करणे म्हणजे पुन्हा नाही असे सांगत आपण राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या सोबत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण कोणत्याही जातीपातीच्या आंदोलनात आता सहभागी होणार नसल्याचे ठरविले आहे. शेतकरी आणि विकलांग हे सर्व जातींमध्ये असल्याने कोणत्याही एका जातीत न अडकता व्यापक विचार ठेवत आपण यापुढे कोणत्याही जातीच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button