चार राज्यांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा सरस
काशीत नरेंद्र मोदी, गोरखपुरात आदित्यनाथ, नागपुरात देवेंद्र हरल्याचे ट्रोल

प्रमुख नेत्यांचेच गड ढासळल्याने खळ
मुंबई/29 ऑक्टोबर -देशभरात चार राज्यांमध्ये 28 जागांसाठी निवडणुका झाल्या. 23 ऑक्टोबरला झालेल्या या निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला मंगळवारी (27 ऑक्टोबर) सुरुवात झाली. त्यानंतर आज गुरुवारी (29 ऑक्टोबर) या निवडणुकीचे संपूर्ण अधिकृत निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप सरस ठरली आहे. कारण, भाजपने सर्वाधिक जागा या निवडणुकीत जिंकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एनडीएने 16 आणि इंडिया आघाडीने 9 आणि इतर 3 जागा विजयी झालेल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत भाजप किंवा एनडीए सरस ठरलेली असली तरी भाजपचे जे प्रमुख गड होते, ते मात्र ढासळले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार असलेले वाराणसी लोकसभेतील वाराणसी पदवीधर मतदारसंघ, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी असलेल्या नागपुरात पदवीधर मतदारसंघ आणि भाजपचा बालेकिल्ला असलेला पुणे पदवीधर. त्याशिवाय, योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेला गोरखपूरमध्ये अवघ्या काही मतांनी भाजपला ही जागा राखता आली आहे. 4 राज्यातील 28 जागांच्या मतमोजणीला मंगळवारी, 27 ऑक्टोबरला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या 4 मोठ्या राज्यांतील 28 जागांसाठी विधान परिषद निवडणुका झाल्या. या निवडणुका मतपत्रिकांचा (बॅलेट पेपर) वापर करून घेण्यात आल्या. सांगा पाहू, काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील? असा प्रश्न उपस्थित करत भाजपवर जहरी टीका केली. कारण, तोपर्यंत काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नव्हता. त्यामुळे त्यांची ही पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी रिपोस्ट करत काँग्रेसला डिवचले. मात्र, अचानकपणे रात्री महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केल्याचे समोर आले. नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला डिवचणारी पोस्ट डिलीट केली. यानंतर मात्र भाजपलाच ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे.





