पुस्तकामुळे पंतप्रधान लोकसभेत आले नाहीत

नवी दिल्ली– काँग्रेस नेते आणि लोक सभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणा वरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी लोकसभेत हजेरी लावली नाही, कारण ते माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकातील मुद्द्यांवर चर्चा होण्यास घाबरत होते. खासदारांकडून कथित धमकी मिळाल्यामुळे पंतप्रधान अनुपस्थित राहिले, हा दावा त्यांनी फेटाळून लावला.राहुल गांधी म्हणाले की, काही जणांनी असा आरोप केला की पंतप्रधानांवर हल्ला होण्याची शक्यता होती. या दाव्यांना त्यांनी थेट आव्हान देत म्हटले की, जर कोणत्याही सदस्याने पंतप्रधानांना धमकी दिली असेल.




