खरातला मदत करणारे नाशिकचे डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

नाशिक/31मार्च: महिला लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक प्रकरण समोर येत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण?-सध्या पोलीस कस्टडीत असलेल्या अशोक खरात याची डखढ कडून कसून चौकशी सुरू आहे. या तपास पथकाच्या चौकशीत खरात याच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. महिलांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात काही विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या देत होता का? आणि ही औषधे त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळत होती? या दिशेने देखील संमोहित करण्यासाठी औषधं? इतकेच नव्हे तर महिलांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्यांना संमोहित करण्यासाठी देखील काही विशिष्ट औषधांचा वापर केला जात होता का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रतिबंधित औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला? आणि त्यामागे कोणत्या नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत? यावर आता तपास यंत्रांनी लक्ष केंद्रित केले नाशिकचे बडे डॉक्टर रडारवर येत्या काही दिवसांत डखढ च्या तपासातून आणखी काही खळबळजनक आणि गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर या गुन्ह्यात डॉक्टरांचे संगनमत असल्याचे निष्पन्न झाले तर, नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रातील काही मोठी नावे या प्रकरणात अडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता एकूणच तपास यंत्रणांच्या या दिशेने सुरू असलेल्या चौकशीत काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.आहे.ता तपास सुरू आहे.




