आंदोलकांना दहशतवादी म्हणणे चुकीचे
बच्चू कडूंनी सदाभाऊ खोतांना सुनावले

नवी दिल्ली/21 जुलै : आंदोलन हा देशाचा आत्मा आहे. आंदोलन करणार्यांना दहशतवादी म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांबाबत केलेले वक्तव्य करायला नको होते, असे म्हणत त्यांना सुनावले. याचवेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेसह विविध क्षेत्रातील सुधारणांसाठी आंदोलनांची गरजही अधोरेखित केली. व्यक्तिगत पातळीवर आंदोलकांच्या काही भूमिका मला पटत नसल्या तरी परीक्षा व्यवस्थित झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही अत्यंत आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीत बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र सुधारण्याची गरज असून, या व्यवस्थेला कायमस्वरूपी दर्जा आणि स्थैर्य मिळाले पाहिजे. देशात आंदोलनं झाली पाहिजेत. आंदोलनातून मिळणारे यश देश लक्षात ठेवतो मात्र बैठकीत झालेल्या चर्चेतील गोष्टी कोण लक्षात ठेवते? असा सवाल त्यांनी केला.आजच्या आंदोलकांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आज दिपके यांचे महत्त्व वाढले आहे. त्यांनी या आंदोलनाचा उपयोग व्यवस्था सुधारण्यासाठी केला पाहिजे.





