स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरणाचे संवर्धन करा

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून महत्वाच्या सूचना

अमरावती/21 जुलै : अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवार, दि. 21 जुलै 2026 रोजी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच ेशान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आयुक्तांनी कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍याच्या वर्गीकरणाची प्रक्रिया, सेंद्रिय खत निर्मितीची कार्यपद्धती, कचर्‍याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट, डेपोतील स्वच्छता, यंत्रसामग्रीची स्थिती तसेच मनुष्यबळाच्या कार्यपद्धतीची माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून घेतली. कंपोस्ट निर्मितीची प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी बायोमायनिंग तसेच सॅनिटरी लँडफिलसाईट डेव्हलपमेन्ट बाबत माहिती जाणून घेतली. घनकचर्‍यापासून निर्माण होणार्‍या बायो प्रोडक्ट जसे आरडीएफ खत व इतर वस्तू त्याचे विल्हेवाट लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.
डेपो परिसरात स्वच्छता राखणे, कचर्‍याची साठवण योग्य पद्धतीने करणे, दुर्गंधी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे,
पावसाळ्यात साचणारे पाणी रोखण्यासाठी आवश्यक नियोजन करणे तसेच पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही
त्यांनी अधिकार्‍यांना दिले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याने कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर आयुक्तांनी सुकळी येथील ेशान दहन केंद्राची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, दहन प्रक्रिया आणि उपलब्ध यंत्रणेची माहिती घेतली. भटक्या व मृत ेशानांची विल्हेवाट वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक
पद्धतीने लावली जात आहे का, याची त्यांनी खात्री केली. दहन केंद्राचे कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित व नियमानुसार राहावे,
यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या. पाहणीदरम्यान अतिरिक्त
आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, पशुशल्य चिकीत्सक डॉ.तुषार पोहनकर, अभियंता विवेक देशमुख, राजेश आगरकर, अभियंते, कंत्राटदार प्रतिनिधी, ेशान दहन केंद्राशी संबंधित कर्मचारी, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button